सोयाबीनचे वाढलेले दर कायम ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:06+5:302021-08-14T04:47:06+5:30

महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ या भागातील शेतकऱ्यांना कोणताही जोडधंदा नसून, त्यांना शेतीशिवाय जीवन जगण्याकरिता कोणताही पर्याय नाही. शेती खर्चाचा ...

Demand for maintaining soybean prices | सोयाबीनचे वाढलेले दर कायम ठेवण्याची मागणी

सोयाबीनचे वाढलेले दर कायम ठेवण्याची मागणी

महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ या भागातील शेतकऱ्यांना कोणताही जोडधंदा नसून, त्यांना शेतीशिवाय जीवन जगण्याकरिता कोणताही पर्याय नाही. शेती खर्चाचा विचार करता सोयाबीनला जवळपास १२ हजार प्रति क्विंटल हमीभाव ठेवल्यास शेतकऱ्याला शेतीचा खर्चाच्या आधारित जेमतेम रक्कम मिळेल व शेतकऱ्यांना भावीकाळात कर्जमाफी मागण्याची स्थिती उद्भवणार नाही , तसेच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल अथवा होणारच नाही . याभागात ज्या वेळेस शेतकऱ्यांकडील माल विक्रीकरिता होता त्यावेळेस सोयाबीनला फक्त ३००० ते ५०००पर्यंतच देण्यात आला. आता दर वाढले असताना शेतकऱ्यांकडे माल नाही. याचा विचार करून शासनाने सोयाबीनचे वाढले दर कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Demand for maintaining soybean prices