पीककर्जची रक्कम वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:40 IST2021-04-17T04:40:10+5:302021-04-17T04:40:10+5:30
१०० वर्ष जूनी असलेल्या अकोला जिल्हा बँक ही शेतकरी सभासद यांचे कडून भाग भांडवल दरवर्षी कपात करते. यावर ...

पीककर्जची रक्कम वाढविण्याची मागणी
१०० वर्ष जूनी असलेल्या अकोला जिल्हा बँक ही शेतकरी सभासद यांचे कडून भाग भांडवल दरवर्षी कपात करते. यावर मात्र लाभांश दिला जात नाही,
सभासद मयत झाल्यावर परत करीत नाही, नवीन सभासदला कर्ज पुरवठा करीत नाही, आदी आरोप शेतकर्यांनी केले. शेतीची एकरी किंमत ३ ते १० लाख रुपये आहे आणि त्यांना एकरी १२ हज़ार रुपये पीककर्ज दिले जाते. १०, १२ हजार रूपयात शेतकरी हे शेतीसाठि बियाने, खते, ओषधिची व्यवस्था कशी करेल? असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पश्चिम महारास्ट्राच्या धरतीवर २५ ते ५० हज़ार एकरी कर्ज वाटप करावे, अशी मागणी कारंजा-मानोरा शेतकरी संघर्ष समितिचे अध्यक्ष देवराव राठोड नाईक यांनी केली.