सलीम तेली यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:52+5:302021-03-17T04:42:52+5:30

निवेदनात नमूद आहे की, मो. युसूफ मो. शफी पुंजानी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, तसेच एक समाजसेवक व राजकीय नेता म्हणून ...

Demand to file charges against Salim Teli | सलीम तेली यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

सलीम तेली यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

निवेदनात नमूद आहे की, मो. युसूफ मो. शफी पुंजानी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, तसेच एक समाजसेवक व राजकीय नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. असे असताना काही लोक राजकीय द्वेषातून किंवा कोणाच्या सांगण्यावरून हेतुपुरस्सर पुंजानी व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करीत आहेत. १२ मार्च रोजी व्हाॅट्सअ‍ॅप व इतर समाजमाध्यमांद्वारे मो. युसूफ मो. शफी पुंजानी यांची ते बेकायदेशीर मार्गाने बांधकाम करणारे व लोकांची फसवणूक करणारे बिल्डर, भूमाफिया असल्याचा बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध व प्रसारित करण्यात आला. सलीम इस्माईल चव्हाण, रा. कारंजा यांनी हा प्रकार केला आहे. पुंजानी यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे विनाकारण बदनामी करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जुम्मा पप्पूवाले, फिरोज शेकुवाले, अ. एजाज अ. मन्नान, चांदशहा कासमशहा, मुबारकखान तमीजखान, शाहीनबी जाकीर शेख, सलीम शेख लालू गारवे, वर्षा राजू इंगोले, मालन भोजा प्यारेवाले, जावेदोद्दीन इस्लामोद्दीन, अनिसाबी शे. युनूस, शायका परविन अ. रशीद, फैमीदाबी अब्दुल आरिफ, रुबीना परविन इरफानखान, अल्लीमुनीसा अब्बासअली, इर्शाद अली रियासत अली, सय्यद मुजाहीद सय्यद अजीज, निसार खान नजीर खान, प्रतिभा सोनोने, चंदन रमेश गणराज, काँग्रेसचे शहराध्यक्ष हमीद शेख आदींची उपस्थिती होती.

.................

बॉक्स :

सलीम तेली यांचे धरणे आंदोलन स्थगित

मौजे भीलखेडा येथील सर्व्हे नंबर १४ मधील प्लॉट क्रमांक २३ व २४ मध्ये खोटे व बनावट बांधकाम केल्याचा मुद्दा समोर करून मो सलीम मो. इस्माईल तेली यांनी ग्रामसेवक अनिल ठोकबर्डे व युसूफ पुंजानी, रिजवाना पुंजानी व इतर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी १५ मार्चपासून पं.स. कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली होती. येत्या सात दिवसांत योग्य ती कार्यवाही करण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्वासनाने सलीम तेली यांनी धरणे आंदोलन मागे घेतले.

Web Title: Demand to file charges against Salim Teli