मातीच्या पणत्यांची मागणी घटली!
By Admin | Updated: October 23, 2014 00:55 IST2014-10-23T00:55:52+5:302014-10-23T00:55:52+5:30
कुंभाराचा परंपरागत व्यवसाय मोडकळीस.

मातीच्या पणत्यांची मागणी घटली!
वाशिम : हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा सण समजला जाणारा दिव्यांचा सण म्हणजे दि पावली. या सणात मातीच्या पणत्यांचे महत्वाचे स्थान असून कलात्मक बदलामुळे मात्र ते महत्व बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटा पणत्यांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. मा तीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागणी नसल्याने जिल्हयात जवळपास ३0 लाख पणत्या बनविणार्या कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केले आहे. हिच परिस्थिती अकोला व बुलढाणा जिल्हयात दिसून येते. पारंपारिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी काही कुंभार मात्र आधुनिकतेशी लढाई करीत आहेत.
वाशिम शहरातील ९५ टक्के कुंभारांनी दिवाळीसाठी लागणार्या पणत्या न बनविता कलकत्ता येथील व्यापार्यांकडून ५00 रूपये हजाराने विकत घेतल्या व ९00 रूपये भावाने विकत असल्याने काही वर्षानंतर मातीच्या पणत्या नामशेष झाल्याशिवाय राहणार नाहीत ऐवढे मात्र नक्की. वाशिम शहरात जवळपास २५ कुंभार असून या दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मी मुर्त्या, मापलं, खेळभांडी बनवितात. दिपावलीसाठी लागणार्या काही मोजके कुंभार वगळता पणत्या बनविणे बंद केले आहे. नागरिक मातीच्या पणत्यांना खरेदी करीत नसल्याने आम्ही त्या बनविण्याचे सोडून दिल्याचे कुंभारांचे म्हणणे आहे.