गाजर गवत निर्मूलनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:40+5:302021-08-27T04:44:40+5:30
रस्त्याच्या कडेला वृक्षविक्रीचा व्यवसाय वाशिम : विशेषत: पावसाळ्यात वृक्षलागवडीला चांगलीच गती मिळते. घर परिसरातही शोभिवंत झाडांची लागवड करण्यात येते. ...

गाजर गवत निर्मूलनाची मागणी
रस्त्याच्या कडेला वृक्षविक्रीचा व्यवसाय
वाशिम : विशेषत: पावसाळ्यात वृक्षलागवडीला चांगलीच गती मिळते. घर परिसरातही शोभिवंत झाडांची लागवड करण्यात येते. ही बाब लक्षात घेता विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला वृक्षविक्रीचा व्यवसाय सुरू झाला.
गोटे महाविद्यालयात वृक्षारोपण
वाशिम : स्थानिक मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार्यक्रम अधिकारी डॉ. विकास चांदजकर यांनी केले.
फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : जिल्ह्यातील गावांत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. गत २५ जुलैपासून हा उपक्रम सुरू आहे. कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
दिशादर्शकाअभावी चालकांची दिशाभूल
वाशिम : मानोरा तालुक्यातील कारपा ते मानोरा मार्गाला जोडणाऱ्या आसोला खु. फाट्यावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे या मार्गाने मानोरा किंवा शेंदुरजना आढावकडे जाणाऱ्या नव्या चालकांत संभ्रम निर्माण होत आहे.
रस्त्याची दैना
वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज नेणाऱ्या वाहनाने रस्त्याची दैना झाली आहे.