डांबरी रस्ता कामाची चाैकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:43+5:302021-04-03T04:37:43+5:30

या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने खाेरने यांनी ...

Demand for asphalt road work with wheels | डांबरी रस्ता कामाची चाैकशी करण्याची मागणी

डांबरी रस्ता कामाची चाैकशी करण्याची मागणी

या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने खाेरने यांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये नमूद केले, की फाळेगाव थेट ते शिरपूर मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे . याबाबत कंत्राटदारांना वारंवार दर्जेदार रस्ता बनवण्याचे सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तरी या रस्त्याची चौकशी करण्यात यावी. परत रस्ता दर्जेदार बनवण्याची मागणी दिगंबर खोरने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर खोरने, महादेव लांभाडे, दत्ता वारेकर, शाहीद खान, नारायण खोडके, संतोष जाधव, प्रवीण राठोड यांची उपस्थिती हाेती.

Web Title: Demand for asphalt road work with wheels