अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST2021-05-15T04:39:49+5:302021-05-15T04:39:49+5:30
शेलू बु. येथील शंकर विठ्ठल होलगिरे यांची मुलगी नंदिनी शंकर होलगिरे हिला ११ मे २०२१ च्या रात्री १२ ते ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी
शेलू बु. येथील शंकर विठ्ठल होलगिरे यांची मुलगी नंदिनी शंकर होलगिरे हिला ११ मे २०२१ च्या रात्री १२ ते २ वाजताच्या सुमारास मोबाईलवर एसएमएस करून बोलावून घेत पळवून नेण्यात आले. त्यानंतर मुलीचा बराच वेळ शोध घेऊनही ती सापडली नाही. १२ मे २०२१ रोजी याप्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांच्या चाैकशीत १३ मे रोजी सायंकाळी गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत सदर मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. तसेच चारपैकी एका आरोपीस अटक केली; मात्र इतर तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, फरार आरोपींनाही तत्काळ अटक करून सर्वांची डीएनए चाचणी करावी व आदिवासी पाॅस्को कायद्यान्वये तसेच कलम ३०२, कलम ३७६ नुसार गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संबंधितांनी निवेदनात केली आहे. दरम्यान, अनसिंग पोलिसांनी याप्रकरणी अविनाश पवार, सुधाकर पवार आणि प्रवीण पवार या तिघांविरूद्ध भादंविचे कलम ३६३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.