पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:45 IST2021-08-27T04:45:00+5:302021-08-27T04:45:00+5:30
................... वाशिम शहरात आढळला एक रुग्ण वाशिम : जिल्ह्यात इतर ठिकाणी गुरूवारी कोरोना बाधित एकही रुग्ण आढळला नाही. केवळ ...

पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी
...................
वाशिम शहरात आढळला एक रुग्ण
वाशिम : जिल्ह्यात इतर ठिकाणी गुरूवारी कोरोना बाधित एकही रुग्ण आढळला नाही. केवळ वाशिम शहरात नव्याने एक बाधित रुग्ण निष्पन्न झाला. दरम्यान, कोरोनाचे संकट बहुतांशी नियंत्रणात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
................
डास प्रतिबंधक धूर फवारणीची मागणी
वाशिम : शहरातील पंचशिल नगर, अल्लडा प्लाॅट यासह गवळीपुरा, खाटीकपुरा, बागवानपुरा आदी भागात अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्थानिक नगर परिषदेने याकडे लक्ष पुरवून डास प्रतिबंधक धूर फवारणी करावी, अशी मागणी राजू सहातोंडे यांनी गुरूवारी केली.
..............
पावसाची दडी, तापमानात वाढ
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण निवळण्यासोबतच पावसानेही दडी मारली. कडक उन्ह तापत असून तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम होऊन सर्दी, ताप, खोकला आदी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
...................
खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन
वाशिम : कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी पूर्णत: संपलेले नाही. असे असताना विशेषत: खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांकडून ना तोंडाला मास्क लावले जात आहे, ना फिजीकल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
.............
रस्ता दुभाजकाअभावी वाहतूक विस्कळीत
वाशिम : शहरातील अनेक ठिकाणच्या प्रमुख मार्गांवर रस्ता दुभाजकाची सोय नाही. यामुळे मन मानेल त्या पद्धतीने वाहने चालविण्यात येत आहेत. परिणामी, दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. नगर परिषदेने दुभाजक उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अविनाश मुळे यांनी केली.
..............
खासगीकरणाला कर्मचाऱ्यांचा विरोध
वाशिम : पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांचे खासगीकरण करण्याची जोरदार हालचाल शासनस्तरावर सुरू आहे. यामुळे कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात सापडली असून या निर्णयास कर्मचाऱ्यांमधून विरोध दर्शविण्यात येत आहे.
..............
रिक्त पदे भरण्याची मागणी
वाशिम : लघूसिंचन विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे धरणांच्या देखभाल, दुरूस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष पुरवून रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.