शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार विरोधी कायद्याची अवहेलना

By admin | Updated: October 11, 2014 01:11 IST

लोकमत स्टिंग ऑपरेशन: कारंजा तालुक्यातील चित्र, अनेक चिमुकल्यांचे भविष्य अंधकारमय.

कारंजालाड (वाशिम) : कें द्र आणि राज्यसरकारकडून बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत असताना कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानांवर १४ वर्षांखालील बालकांचा कामासाठी उपयोग करून त्यांचे भविष्य अंधकारमय करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या देशातील १४ वर्षांखालील बालकांची संख्या ही अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक असल्याचे सांगण्यात येते. त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने विविध योजना राबवून बाल कामगार समस्येवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करते; परंतु भारतातील प्रत्येक राज्यात विविध क्षेत्रात अनेकांकडून आजही बालकामगारांचा वापर करण्यात येतो. प्रत्यक्षात १९८६ च्या बाल कामगार विरोधी कायद्यानुसार १४ वर्षांखालील बालकांचा कामगार म्हणून वापर करणे कायदेशीर गुन्हा आहे. त्याशिवाय शासनाने एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून २00९ चा अधिनियम क्रमांक ३९ नुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार बहाल केला आहे; मात्र बालमजुरी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची प्रत्यक्षात योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील विविध व्यापारी प्रतिष्ठाणे, तसेच लहानसहान खासगी उद्योग व्यवसायात १४ वर्षांखालील बालकांचा कामगार म्हणून सर्रास वापर करण्यात येत असल्याचे दिसते. सदर कायद्याचे ज्ञान नसल्यामुळेच आजही ग्रामीण भागात वीटभट्टयांवर, बांधकामांवर व शेतीच्या विविध कामांसाठी बालकांचा कामगार म्हणून वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षणाच्या प्रवाहात मागे पडल्यामुळे आयुष्यभर मजुरीची कामे करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संबंधित विभागातील अधिकार्‍यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन १४ वर्षांखालील बालकांचा कामगार म्हणून वापर करणार्‍या खासगी प्रतिष्ठाणांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. या संदर्भात कामगार अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.