शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई; पाण्यासाठी रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:07 IST

मंगरुळपीर तालुकयात असे काही चित्र असून तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांच्या पाण्यासाठी रांगा लागताना दिसून येत आहेत.

- नाना देवळे मंगरुळपीर  : गेली अनेक वर्षांपासून निसर्गाच्या समतोल बिघडल्याने पर्जन्यमानात मोठी घट होत आहे. त्यामुळे दरवर्षी अनेकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन शासनाने वेळीच उपाययोजना करने गरजेचे आहे, मात्र शासन ऐनवेळी व संथगतीने उपाययोजना करीत असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे, मंगरुळपीर तालुकयात असे काही चित्र असून तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांच्या पाण्यासाठी रांगा लागताना दिसून येत आहेत.  ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला, तरी गेली अनेक वर्षांपासून विनापरवाना पाण्याचा वारेमाप उपसा होत असल्यामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे , त्यामुळे उन्हाळ्यापुर्वीच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणाºया योजनावरील कूपनलिका पुर्णत: तळाला गेल्या आहेत,. याशिवाय परिसरातील नदी, नाले , विहिरी कोरडया पडल्या आहेत, . त्यामुळे अनेक गावाचा पाणीपुरवठा प्रभावीत होऊन ग्रामस्थांला  मजुरीचे कामे बाजूला सारुन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . परिणामी पाणी दूरवरून आणावे लागत असल्याने पूर्ण दिवस पाणी आणण्यासाठी जातो. त्यामुळे अनेक समस्याला सामोर जावे लागते. पाणीटंचाई तीव्रता  ही बाब लक्षात घेऊन शासनाने यावर तात्काळ उपाय योजना करणे आवश्यक असताना पाणीटंचाई उपाययोजना काम संथगतीने होत असल्याचे दिसून येत आहे . जनतेची गरज लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमध्ये केली जात आहे.मंगरुळपीर तालुक्यातील ११६ गावापैकी २९ गावाने जलस्तोस्त्र अधिग्रहण साठी पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले आहे. यामध्ये शेंदुरजना मोरे,लाठी झाडगाव, जांब प्लॉट, पिंप्री अवगण, आजगाव, माळशेलु,शेगी, मजलापूर, खापरी, पोटी, चीचखेडा, चेहेल, स्वासीन, रहित, धानोरा बु,सालंबी, वसंतवाडी, मोझरी, चांभई, जोगलदरी, पारवा, अरक, चिंचाळा, बोरवा, शिवनी रोड, धोत्रा, जांब, मसोला, पिपळखुटा, गोलवाडी, ईचा, पिप्री अवगण, जनूना, बालदेव, कोठारी तर टँकरकरीता प्रस्ताव करिता बिटोडा भोयर, कळंबा बोडखे, धानोरा खु, सनगाव, सोनखास, शहापूर, या गावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे पाठविला आहे. यापैकी २९ विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव तहसील विभागाने मंजूर केला आहे, परंतु अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे ग्रामास्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तलावाची घटलेली पाणीपातळी मोतसावंगा २२.३५, सिंगडोह मृतसाठा, सावरगाव एलएएल खाली,  कोलंबी एल.एस.एल. खाली, जोगलदरी १४.८५, कासोळा १२.३, चांदई कोरडा, दस्तापुर ११,५० पाणी पातळी असून  नादखेडा, चोरद , मोहरी, पिप्री , स्वासीन, साशीर्, कवठळ , पिप्री बु, , सार्शी १ हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. येत्या काही दिवसांनी ज्यामध्ये जलसाठा आहे तेही कोरडे पडणार असल्याचे चिन्ह आहे.  मागणी केलेल्या गावाचा प्रस्ताव वरिष्टकडे पाठवला आहे मंजूर होताच पाणी पुरवठा करण्यात येईल.तशा उपाय योजना करण्यात येत आहेत.- ज्ञानेश्वर टाकरस, गटविकास अधिकारी, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरwater scarcityपाणी टंचाई