भर जहागिर येथे नेहमीच ज्येष्ठा गौरीच्या सजावटीसाठी नानाविध देखावे करण्याची अनेकांमध्ये स्पर्धा लागते. हे देखावे यंदाही करण्यात आले असून, कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करून महिला भाविक ज्येष्ठा गौरीचे देखावे पाहात आहेत. अनेक कुटुंबांनी कोरोना, स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव आदिबाबत जनजागृती करणारे देखावे तयार केले आहेत. या उत्सवात अनेक ठिकाणी ज्येष्ठा गौरींची सजावट मनमोहक हस्त कला, कलाकुसरीतून करण्यात आली आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन होणार आहे.
-------------
उत्कृष्ट सजावटीची स्पर्धा
ज्येष्ठा गौरी उत्सव भर जहॉगिर येथे अनेकांच्या घरी साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त उत्कृष्ट ज्येष्ठा गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन गावातील काही युवकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी ज्येष्ठा गौरीच्या सजावटीकडे विशेष दक्ष दिल्याचे दिसत आहे.