वाशिमच्या गौरवशाली नाट्यचळवळीला उतरती कळा

By Admin | Updated: November 30, 2014 23:54 IST2014-11-30T23:54:53+5:302014-11-30T23:54:53+5:30

रंगभूमी दिन विशेष : आचार्य अत्रेंनी आत्मचरित्रात केला होता वाशिमच्या नाट्यचळवळीचा गौरव.

Decline to play the glorious drama of Wasim | वाशिमच्या गौरवशाली नाट्यचळवळीला उतरती कळा

वाशिमच्या गौरवशाली नाट्यचळवळीला उतरती कळा

धनंजय कपाले /वाशिम
एकेकाळी वैभवशाली असलेली येथील नाट्यचळवळ आजघडीला टीव्हीचा वाढता प्रसार, रसिकांची बदललेली अभिरुची, लोप पावलेला रसिकाश्रय व औषधालाही शिल्लक नसलेला राजाश्रय यातून या नाट्यपरंपरेची पडझड झाली असलीतरी एका काळी वाशिमच्या रंगकर्मीनी राज्याची रंगभूमी गाजविली असल्याचा गौरवशाली इतिहास वाशिमच्या रंगकर्र्मींनी घडविला आहे.
येथील नाट्य कलावंत मंडळांनी सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे मुंबईच्या नाट्यगृहात प्रयोग लावण्याचे धाडस केले होते. विशेष म्हणजे तेथील सृजनशील रसिकांनी हे प्रयोग डोक्यावर घेत वाशिमकर कलावंतांच्या यशाची पावती दिली. वाशिमचा शो आणि हाउसफुल्लची पाटी हे समीकरण दृढ झाले होते. याची दखल आचार्य अत्रे यांनी यांच्या मी कसा घडलो या आत्मचरित्रात घेतली होती. मात्र, आजमितीला पुरातनकाळी जागतिक कीर्तीच्या राजशेखरसारख्या नाटककाराचे व १८ शतकात महाराष्ट्राची व्यावसायिक रंगभूमी गाजविणार्‍या करुणेश्‍वर प्रासादिक संगीत मंडळीच्या नाट्यवैभवाचा वारसा सांगणार्‍या तत्कालीन वत्सगुल्म व आताच्या वाशिमतील नाट्यचळवळ लोकाश्रय व राजाश्रयाअभावी थंडावली आहे.१९६५ ते ८५ च्या कालखंडात सुरुचित साधना या नाट्यसंस्थेने नावलौकिक मिळविला. हे मंडळ डॉ. ह.त्र्यं. खरे यांनी स्थापन केले होते. सुधाताई राजे अँड. भाउसाहेब काळू, श्रीपाद माझोडकर, ध.ह. खरे, बी.वाय. पाटक ,डी.ए. कुळकर्णी यासारखे कलावंत तर अण्णासाहेब मुळे व अण्णासाहेब आमडेकरासारखे दिग्दर्शक या संस्थेने कलावतरुळात दिले.
विदर्भ साहित्य संमेलनात या मंडळाने सादर केलेले प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक विशेष गाजले.१९८0 च्या दरम्यान येथील नाट्यचळवळीत डॉ. रवि जाधव, धनंजय खरे, दिलीप देशमुख, बाबुजी (एकनाथ) कदम, छाया काळे, मंगल इंगोले, साहेबराव खोब्रागडे, रोहिणी खरे, विकास देशपांडे, नाना काळे, एस.एम. आहाळे आदींनी राजशेखर नाट्य मंडळाची स्थापना केली. या मंडळाने सादर केलेले माझी घरटी माझी पिल्ल, भोवरा, खामोश, अदालत जारी है. वल्लभपुरची दंतकथा, डाग, घोटभर पाणी या एकांकिका गाजल्या. यातील एस.एम.आहाळे सद्या आघाडीचे चित्रपट कथाकार आहेत. त्यांनी हम आपके है कौन, मैने प्यार किया यासह राजश्री प्रॉडक्शनच्या इतर चित्रपटांसाठी लेखन केलेले आहे.

Web Title: Decline to play the glorious drama of Wasim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.