शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

वाशिम जिल्ह्यातील व्यापारपेठांमधील व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 4:59 PM

वाशिम : रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेली १० रुपयांची सर्वच नाणी वैध असून ते बिनदिक्कतपणे स्विकारण्यात यावे, अ से संदेश ‘आरबीआय’कडून नागरिकांच्या मोबाईलवर पाठवून जनजागृती केली जात आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करून वाशिम जिल्ह्याच्या व्यापारपेठेतील बहुतांश व्यावसायिकांकडून ही नाणी स्विकारण्यास ग्राहकांना नकार दिला जात आहे. यामुळे ज्यांच्याकडे १० रुपयांची नाणी पडून ...

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्याच्या व्यापारपेठेतील बहुतांश व्यावसायिकांकडून ही नाणी स्विकारण्यास ग्राहकांना नकार दिला जात आहे.यामुळे ज्यांच्याकडे १० रुपयांची नाणी पडून आहेत, ते नागरिक पुरते वैतागले आहेत.स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेतही आठवड्यातील केवळ बुधवारीच ही नाणी स्विकारली जातात.

वाशिम : रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेली १० रुपयांची सर्वच नाणी वैध असून ते बिनदिक्कतपणे स्विकारण्यात यावे, असे संदेश ‘आरबीआय’कडून नागरिकांच्या मोबाईलवर पाठवून जनजागृती केली जात आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करून वाशिम जिल्ह्याच्या व्यापारपेठेतील बहुतांश व्यावसायिकांकडून ही नाणी स्विकारण्यास ग्राहकांना नकार दिला जात आहे. यामुळे ज्यांच्याकडे १० रुपयांची नाणी पडून आहेत, ते नागरिक पुरते वैतागले असून ही समस्या निकाली काढण्याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचा सूर सर्वच स्तरांतून उमटत आहे.१० रुपयांची १४ प्रकारची नाणी चलनात असून त्यापैकी कुठल्याच नाण्यावर अद्याप बंदी लादण्यात आलेली नाही, असे ‘आरबीआय’ने १७ जानेवारी २०१८ ला स्पष्ट करून नागरिकांना यासंदर्भात जनजागृतीपर संदेशही पाठविले आहेत. असे असतानाही वाशिम जिल्ह्यातील व्यापारपेठांमधील बहुतांश व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

‘रिकरिंग एजन्ट’ही स्विकारेना १० रुपयांचे नाणे!दैनंदिन बचतीच्या हेतूने अनेक नागरिकांकडून विविध बँकांच्या ‘रिकरिंग एजन्ट’च्या माध्यमातून बँकेत पैसे टाकले जातात. मात्र, हे एजन्टही ग्राहकांकडून १० रुपयांचे नाणे स्विकारत नसल्याचा प्रकार घडत आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेतही आठवड्यातील केवळ बुधवारीच ही नाणी स्विकारली जातात. मात्र, या एकाच दिवशी ग्राहकांची झुंबड उडत असल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकMarketबाजार