विजेच्या धक्कयाने रिधोरा येथील युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 31, 2014 01:52 IST2014-08-31T01:47:45+5:302014-08-31T01:52:41+5:30
१९ वर्षीय युवकाचा वीज धक्याने मृत्यु झाल्याची घटना

विजेच्या धक्कयाने रिधोरा येथील युवकाचा मृत्यू
रिधोरा : गावाच्या पुर्व दिशेला असलेल्या शेतशिवारात १९ वर्षीय एकनाथ दत्तराव कव्हर याचा विजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी दूपारी १२ वाजताचे सुमारास घडली. दत्तराव कव्हर व त्यांचे कुटूंब गावातीलच डॉ. चंद्रप्रकाश घुगे यांचे शेत नेहमीच बटईने करतात. ३0 ऑगस्ट रोजी सकाळी दत्तराव कव्हर आपला मुलगा एकनाथ याचेसह शेतात फवारणीसाठी गेले होते. दूपारी १२ वाजताचे सुमारास अचानक शेतात जमीनीवर तूटून पडून असलेल्या विजेच्या प्रवाहीत तारांना एकनाथचा स्पर्श झाला. ही बाब लक्षात येताच गावकर्यांच्या मदतीने एकनाथला तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतू तीथे डॉक्टरांनी त्यालाम मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता इंगळे, लाईनमन वायचाळ आदी घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी पंचनामा व इतर सोपस्कारही पार पाडले. रिधोरा शेतशिवारात विज असते केव्हा हा प्रश्न उपस्थित होत असतांना विजेच्या धक्कयामुळे एका मुलाला आपल्या जीवास मुकावे लागल्याने वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत ग्रामस्थांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचार्यांनी वीज पुरवठय़ाची पध्दत व पावसाळ्य़ाचे दिवस पाहता तारांच्या दूरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले असते तर असे घडलेच नसते असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. गत पंधरवड्यात मेडशी येथे दोन म्हशी, राजूरा येथे एक म्हैस विजेच्या धक्कयाने मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्या ठिकाणी एकनाथला विजेचा धक्का बसला त्याठिकाणी याआधी एक हरिण व एका मुंगूसाला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ज्या भागात एकनाथ कव्हर या मुलाचा विजेचा धक्कयाने मृत्यू झाला, त्या भागातील वीज पूरवठय़ाला अर्थींगच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.