उष्माघाताने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: April 22, 2016 02:16 IST2016-04-22T02:16:46+5:302016-04-22T02:16:46+5:30
मानोरा तालुक्यातील तळप बु. येथील शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू.

उष्माघाताने महिलेचा मृत्यू
तळप बु. (जि. वाशिम) : मानोरा तालुक्यातील तळप बु. येथे शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना १९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. रेणुका सीताराम पवार, असे मृत महिलेचे नाव आहे. तळप बु. येथील सीताराम पवार यांच्या शेतात भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे. या पिकात निंदनाचे काम सुरू असून, यासाठीच त्यांच्या पत्नी मंगळवारी पतीसह शेतात काम करीत होत्या. रखरखत्या उन्हात सतत काम करीत असल्याने त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर घरी परत येत असताना रस्त्यात भोवळ येऊन त्या पडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रेणुका पवार या तळप बु. ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.