शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 15:35 IST

मानोरा (वाशिम) : शेतातील दोडक्याचे वेल सरळ करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला विजेचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धावून आलेल्या वडीलालादेखील विजेचा धक्का लागला.

ठळक मुद्दे दत्ता गवळी व विजय गवळी अशी मृतक पिता-पुत्रांची नावे आहे. तारांमध्ये विजेचा प्रवाह आल्याने विजयला विद्युत धक्का बसला. मुलाला स्पर्श करताच विजेचा धक्का लागून वडीलसुध्दा जागीच कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : शेतातील दोडक्याचे वेल सरळ करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला विजेचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धावून आलेल्या वडीलालादेखील विजेचा धक्का लागला. या दुर्देवी घटनेत शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील सावळी येथे ११ जून रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. दत्ता गवळी व विजय गवळी अशी मृतक पिता-पुत्रांची नावे आहे. सावळी येथील पोलीस पाटील गोपाल शेळके यांनी मानोरा पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सावळी येथील शेतकरी दत्ता मारोती गवळी (५०) व मुलगा विजय दत्ता गवळी (२५) हे ११ जून रोजी सकाळी शेतात शिमला मिरचीला पाणी देण्यासाठी गेले होते. मिरची व्यतिरिक्त दोडक्याचे पीकही ते घेतात. दोडक्याच्या वेलीला आधार देण्यासाठी सभोवताल तार बांधण्यात आल. दोडक्याचे वेल सरळ करण्याकरिता विजय गेला असता, बांधलेल्या तारांमध्ये विजेचा प्रवाह आल्याने विजयला विद्युत धक्का बसला. विद्युत धक्क्यामुळे विजय हा जागीच कोसळल्याचे पाहून वडील दत्ता गवळी यांनी विद्युत रोहित्राच्या  बॉक्समधील फ्यूज काढुन मुलाकडे धाव घेतली. फ्यूज काढल्यानंतरही  तारामध्ये वीजप्र्रवाह कायमच राहिला. मुलाला स्पर्श करताच विजेचा धक्का लागून वडीलसुध्दा जागीच कोसळले. ही बाब नजीकच्या शेतात उपस्थित असलेल्या अन्य शेतकºयांच्या लक्षात येताच त्यांनी विजेचा प्रवाह बंद करून  पिता-पुत्राला वाचविण्यासाठी दिग्रस येथे उपचारासाठी हलविले. तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिस पाटील गोपाल शेळके यांनी मानोरा पोलिसांना माहिती दिली. विजेच्या धक्क्याने पितापुत्राचा मृत्यु झाल्याने सावळी गावावर शोककळा पसरली. घटनेची वार्ता समजताच अनेकांनी दिग्रसच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उल्हास वाघ, अभियंता जितेंद्र दामोदर, कनिष्ठ अभियंता गोपाल साबळे घटनास्थळी पंचनाम्याकरिता दाखल झाले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराFarmerशेतकरीDeathमृत्यूelectricityवीज