आणखी एकाचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST2021-06-16T04:53:15+5:302021-06-16T04:53:15+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून ...

Death of another; 44 corona positive | आणखी एकाचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह

आणखी एकाचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्युसंख्येतही घट येत असल्याच चित्र आहे. सोमवारी आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. नव्याने ४४ रुग्ण आढळून आले तर ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली आहे. मंगरूळपीर व मानोरा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१०७३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३९८७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६०१ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.

००००

५९९ सक्रिय रुग्ण

सोमवारच्या अहवालानुसार नव्याने ४४ रुग्ण आढळून आले तर ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ५९९ रुग्ण सक्रिय आहेत.

000000000000

कारंजा तालुक्यात ९ रुग्ण

सोमवारच्या अहवालानुसार कारंजा तालुक्यात नऊ रुग्ण आढळून आले. वाशिम शहरात चार तर ग्रामीण भागात तीन रुग्ण आढळून आले. मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात सहा रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात सहा तर ग्रामीण भागात तीन रुग्ण, मंगरूळपीर तालुक्यात पाच, मानोरा तालुक्यात चार रुग्ण आढळून आले.

००००

Web Title: Death of another; 44 corona positive