शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

नदीपात्रात बुडून मृत्यूमुखी घोषित केलेला ‘तो’ वयोवृद्ध ‘जीवंत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 6:20 PM

शेलुबाजार (वाशिम) : १० आॅक्टोबर रोजी येथील अडाणनदी पात्रात बुडून ७० वर्षीय वयोवृद्धास, मृतदेह आढळल्यानंतर प्रशासनाने मृत घोषित केले होते. दरम्यान मृत घोषित केलेला सदर वयोवृद्ध इसम २३ आॅक्टोबर रोजी शेलुबाजार येथे दिसताच बघ्यांनी एकच गर्दी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) : १० आॅक्टोबर रोजी येथील अडाणनदी पात्रात बुडून ७० वर्षीय वयोवृद्धास, मृतदेह आढळल्यानंतर प्रशासनाने मृत घोषित केले होते. दरम्यान मृत घोषित केलेला सदर वयोवृद्ध इसम २३ आॅक्टोबर रोजी शेलुबाजार येथे दिसताच बघ्यांनी एकच गर्दी केली. अधिक चौकशी केली असता नदीपात्रात बुडून मृत्यू झालेला इसम हा दुसराच कुणीतरी असल्याची बाब समोर आली. १० आॅक्टोबर रोजी एक वृध्द अडाण नदी पात्रात बुडूुन मरण पावल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी रितसर पंचनामा करुन अधिक माहिती घेतली असता, त्या इसमाचे नाव देवराव किसन पानपिते असल्याचे सांगण्यात आले. त्या आधारे जागेवरच शवविच्छेदन आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करुन याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, २३ आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास देवराव पानपिते हे शेलूबाजार येथे दिसताच त्यांना ओळखणाºया नागरिकांनी एकच गर्दी केली. तुम्ही तर नदीपात्रात बुडून मृत्यूमुखी पडले होते, आता जीवंत कसे? असा थेट प्रश्न विचारला असता, मी मागील बºयाच दिवसांपासून कंझरा येथे राखणदारीवर असल्याचे पानपिते यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर निराधार योजनेंतर्गतचे अनुदान आले की नाही हे पाहण्यासाठी पानपिते हे बँकेत गेले असता, तेथेही गर्दी झाली. तुम्ही जीवंत कसे, या प्रश्नाने व्यथित झालेल्या पानपिते यांनी थेट शेलुबाजार पोलीस चौकी गाठत स्वत:चे लाठी येथील रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्डची प्रत दाखविली. यामुळे सर्वच अचंबित झाले असून, नदी पात्रात बुडून मरण पावलेला तो वयोवृद्ध कोण? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. नदीपात्रात बुडून मृत्यू पावलेल्या इसमाचा मृतदेह आढळल्यानंतर अंतिम संस्कारही करण्यात आले. त्यामुळे ‘त्या’ अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

टॅग्स :washimवाशिम