शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरिय तपासणीसाठी मुलीचा पुरलेला मृतदेह काढला

By admin | Updated: September 19, 2014 01:33 IST

शिरपूर येथील घटना : चुकीच्या उपचारामुळे मुलगी दगावल्याचा आरोप.

वाशिम : शिरपुर पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या केनवड येथील एका ९ वर्षीय मुलीचा मृतदेह अंत्यविधी झाल्यानंतर उत्तरिय तपासणीसाठी गुरूवारी काढण्यात आला. चुकीच्या उपचाराने ती दगावल्याचा आरोप वडिलांनी केल्यामुळे पोलिसांनी मुलीचा मृतदेह अकोला येथे तपासणीसाठी पाठविला. शिरपुर पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या केनवड येथील गजानन शेषराव कांबळे यांची नऊ वर्षाची मुलगी प्रज्ञा ही तापाने आजारी होती. तिला केनवड येथील डॉ. गणेश घोटे यांच्याकडे उपचारासाठी भरती करण्यात आले होते; मात्र तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यामुळे डॉ. घोटे यांनी प्रज्ञाला मेहकर येथील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठविले. गजानन कांबळे यांनी प्रज्ञाला मेहकर येथील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले; मात्र तेथील डॉक्टरने प्रज्ञाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने तिला वाशिम येथील खासगी डॉक्टरकडे हलविण्याचा सल्ला दिला. १३ सप्टेंबर रोजी तिला मेहकरहून वाशिमकडे उपचारासाठी नेले जात असताना, वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांनी प्रज्ञाचा अंत्यविधी गावामध्येच केला. त्यानंतर प्रज्ञाच्या वडिलांनी डॉक्टरांनी चुकीचा उपचार केल्याचा आरोप करून, याप्रकरणी शिरपुर पोलिस स्टेशनमध्ये १८ सप्टेंबर रोजी तक्रार दिली; मात्र, प्रज्ञाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करणे शक्य नाही. त्यामुळे उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी नातेवाईकांना विचारणा केली. नातेवाईकांनी संमती दर्शविल्यानंतर पोलिस निरिक्षक रमेश जायभाये, पोलिस उपनिरिक्षक कमलेश खंडारे, तहसिलदार कुंभारे यांच्यासह पोलिस कर्मचारी स्मशानभूमिमध्ये पोहचले. प्रज्ञाचा मृतदेह बाहेर काढून अकोला येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती शिरपुर पोलिसांनी दिली. प्रज्ञाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झाल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात डॉ. घोटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आढळला.