चवथ्या दिवशी आढळले ‘त्या’ दोघांचे मृतदेह
By Admin | Updated: February 18, 2015 01:58 IST2015-02-18T01:58:52+5:302015-02-18T01:58:52+5:30
काटेपूर्णा नदीत ट्रक पडून झाला होता अपघात.

चवथ्या दिवशी आढळले ‘त्या’ दोघांचे मृतदेह
मालेगाव (जि. वाशिम) : मुंबई-नागपूर हायवेवर जऊळका जवळील काटेपूर्णा नदीवरील पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात ट्रक नदीत पडून दोन जण बेपत्ता झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यावेळी ट्रकमधील दोघे जण वाचले होते. त्यापैकी बेपत्ता झालेले दोघा जणांचे मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सापडले. १४ फेब्रुवारीच्या रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील मुकुंद नामदेव भोंबरे, भावना नामदेव भोंबरे, ङ्म्रेयस मुकुल भोंबरे व ट्रक चालक सचिन इंगळे हे मूर्ती बनविण्यासाठी येत असलेली पावडर व मोटारसायकलसह इतर साहित्य घेऊन पुणे येथे जात होते. काटेपूर्णा नदीनजीक खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रक नदीत पुलावरून खाली कोसळला. त्यामध्ये मुकुंद नामदेव भोंबरे व भावना नामदेव भोंबरे हे वाचले मात्र त्यांचा मुलगा ङ्म्रेयस व वाहनचालक इंगळे मात्र आढळले नाही. त्यानंतर महान-पिंजर, वाशिम येथील आपत्कालीन बचावपथकाने शोधकार्य केले. दरम्यान, ट्रक बाहेर काढला. त्यावेळी दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यामध्ये यश येत नव्हते म्हणून १६ फेब्रुवारीला दुपारी रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी मूर्तीजापूरचे आ. हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, तहसीलदार जे.आर. बियाते यांच्यासह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भेटी दिल्या; मात्र अपयश येत होते. सतत तीन दिवसांपासून क्रेनद्वारे, बचाव पथकाद्वारे बेपत्ता दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने करण्यात आला; मात्र अपयश आल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात होता. आज अखेर १७ फेब्रुवारी रोजी त्यांचे मृतदेह होडीने पाणी हलवले त्यावेळी सापडले, अशी माहिती पोलीस प्रशासनातर्फे पो.कॉ. प्रेमदास आडे यांनी सांगितले. त्या पुलावरून वारंवार अपघात होतात, त्यामुळे आता तरी त्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी येथील उपस्थित नागरिकांकडून करण्यात येत आहे.