भाजयुमोतर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:45 IST2017-10-10T19:44:18+5:302017-10-10T19:45:43+5:30
वाशिम - केरळ येथे भाजपा व संघ कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध व धिक्कार करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा वाशिम जिल्हा व शहर शाखेतर्फे १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.

भाजयुमोतर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - केरळ येथे भाजपा व संघ कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध व धिक्कार करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा वाशिम जिल्हा व शहर शाखेतर्फे १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.
केरळ राज्यात भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांवर सतत हल्ले होत आहे. या पृष्ठभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केरळ राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला असून, त्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात केरळ सरकारविरोधात निषेध आंदोलन केले जात आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात १० आॅक्टोबर रोजी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती व यवतमाळ जिल्हा प्रभारी राजू पाटील राजे, वाशिम जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्त्वात व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री देशमुख, भाजपा महिला आघाडी सरचिटणीस अंजली पाठक, प्रदेश सदस्य तथा न.प. पाणीपुरवठा सभापती राहुल तुपसांडे, भिमकुमार जीवनानी, जि.प. सदस्य अनिल कांबळे, भाजयुमो शहराध्यक्ष पवन जोगदंड, महिला शहर आघाडीच्या कल्पना खामकर, उषा वानखेडे, मनोहर मारशेटवार, प्रभाकर पदमणे, वत्सला जाधव, दिलीप देशमुख, पवन कंकर, उमाकांत हरणे, रोहित चांदवाणी, लक्ष्मण गाडगे, कैलास मुंगणकर, गणेश जगताप, गणेश वाडकर, ज्ञानेश्वर भोयर, धनंजय घुगे, सौरभ गंगावणे, आनंद गडेकर, सुमित घुगे, राम इंगोले, किशोर गोमाशे, अमोल लोथे, आत्माराम आरू, भिकाजी ढगे, सुधीरकुमार बरकते, डॉ. टाकळकर, वाकुडकर, एकनाथ कदम, उषा कांबळे, मालती गायकवाड, मिना नकले यांच्यासह भाजपा व भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.