गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:43+5:302021-09-14T04:48:43+5:30

शहरातील शिवराज गणेश मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने हिंदू-मुस्लिम एकता वाढविण्यावर भर दिला जातो. यंदाही ...

Darshan of Hindu-Muslim unity in Ganesh Mandal's blood donation camp | गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

शहरातील शिवराज गणेश मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने हिंदू-मुस्लिम एकता वाढविण्यावर भर दिला जातो. यंदाही हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ११ सप्टेंबरला गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात हिंदू युवकांसह मुस्लिम युवकांनीही सहभाग घेत रक्तदान केले. शाडूच्या गणेशमूर्तीची विधिवत पूजाअर्चा करून रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. यावेळी शिवराज गणेश मंडळाकडून रक्तदान करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अकोला येथील साई जीवन ब्लड बँकेचे डॉ. के बी. गडवे, डॉ. व्ही. आर. पाटणकर, सिद्धार्थ कटारे, गौरव भंडारी, एजाज खान, विनोद गवई, समीर कुरेशी, आदींनी सहभाग घेतला.

----------

नऊ मुस्लिम युवकांनी केले रक्तदान

शहरातील शिवराज गणेश मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यात ११ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात ९० हिंदू युवकांसह नऊ मुस्लिम युवकांनीही रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यास महत्त्वाचे सहकार्य केले.

---------------

130921\img-20210911-wa0036.jpg

raktdan

Web Title: Darshan of Hindu-Muslim unity in Ganesh Mandal's blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.