मातंग समाजाचे धरणे
By Admin | Updated: September 10, 2014 00:36 IST2014-09-10T00:36:35+5:302014-09-10T00:36:35+5:30
कारंजालाड व मंगरूळपीर येथे स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी मांतग समाजाचे आंदोलन.

मातंग समाजाचे धरणे
कारंजालाड : मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज आरक्षण हक्क परिषदेच्या वतीने ९ सप्टेंबरला स्थानिक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
तत्पूर्वी, ६ सप्टेंबर रोजी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना असंख्य समाजातील लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले होते. ज्यामध्ये लहूजी साळे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, क्रांतीविर लहूजी साळवे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे या सह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या.
मंगरूळपीर येथेही मातंग समाजाला वेगळे स्वतंत्र ८ टक्के आरक्षण दय़ावे तसेच इतरही विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर मातंग समाज आरक्षण हक्क परिषदेच्या पदाधिकार्यांनी धरणे दिले.