कर्तव्याच्या नावाखाली दांडी
By Admin | Updated: October 2, 2014 01:27 IST2014-10-02T01:27:36+5:302014-10-02T01:27:36+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशन; अधिकारी-कर्मचा-यांच्या कार्यालयीन उपस्थितीची पोलखोल.

कर्तव्याच्या नावाखाली दांडी
वाशिम : निवडणुकीच्या कर्तव्यावर असल्याच्या नावाखाली शासकीय अधिकारी-कर्मचारी चक्क कार्यालयातून ह्यदांडीह्ण मारत असल्याचे धक्कादायक वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने १ ऑक्टोबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयामध्ये ह्यस्टिंगह्ण करण्यात आले.
सध्या राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधुम सुरु आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने राज्यातील विविध विभागाच्या अनेक कर्मचार्यांना निवडणुकीच्या कामाच्या कर्तव्यावर घेतले आहे. मात्र, कर्तव्याच्या नावाखाली काही विभागांचे अधिकारी-कर्मचारी चक्क आपल्या कार्यालयातून दोन दोन, तीन तीन तास दांडी मारत असल्याच्या बाबीचा पर्दाफाश ह्यलोकमतह्णच्या स्टिंगने केला आहे. लोकमत चमुने १ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात पाहणी केली असता अनेक विभागातील कर्मचारी जागेवर नसल्यामुळे खुच्र्या रिकाम्या दिसून आल्या.
१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३0 वाजता पंचायत समिती कार्यालयात भेट दिली असता पंचायत समितीमधील पंचायत विभाग, लेखा विभाग, पाणीटंचाई व बांधकाम विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग आदी विभागांमध्ये एकूण पाच कर्मचारी कार्यालयात हजर असल्याचे आढळून आले. यामध्ये पंचायत विभागातील एक कर्मचारी, पाणीटंचाई व बांधकाम विभागात एक तर लेखा विभागात तीन कर्मचारी हजर होते. पंचायत समिती कार्यालयात एकूण ३३ कर्मचारी असून गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी, कक्ष अधिकारी, अधिक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, पाच कर्मचार्यांचा समावेश आहे. ३३ पैकी ९ कर्मचारी निवडणूक ड्युटीवर होते तर ६ कर्मचारी शासकीय दौर्यावर असल्याचे अधिकारी यांनी सांगितले प्रत्यक्षात मात्र २८ उर्वरीत कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित आढळून आले.
यानंतर दुपारी ४.0४ वाजता जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयातील खुच्र्या रिकाम्या आढळून आल्या. जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये एकूण १६ कर्मचारी आहेत. कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात एकूण चार कर्मचारी कर्तव्यावर आढळून आले. तर अन्य १२ कर्मचारी कार्यालयात हजर नसल्यामुळे त्यांच्या खुच्र्या रिकाम्या आढळून आल्या. या संदर्भात या विभागाच्या प्रशासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर्मचारी कुठे कुठे व्यस्त आहेत सांगितले. सदर प्रकार ईतरही कार्यालयात सुरू असून निवडणुकीच्या नावाखाली कर्मचारी दांडया मारताना दिसत आहेत.