नुकसानग्रस्त शेतकरी तहसीलवर धडकले

By Admin | Updated: May 28, 2014 23:37 IST2014-05-28T23:04:00+5:302014-05-28T23:37:49+5:30

संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी धडक तहसिल कार्यालय गाठून तहसिलदारांना निवेदन दिले आहे.

Damaged farmers hit the tahsil | नुकसानग्रस्त शेतकरी तहसीलवर धडकले

नुकसानग्रस्त शेतकरी तहसीलवर धडकले

मालेगाव : तालुक्यात २0१३ मध्ये ऑगस्ट महिन्यात अतवृष्टी झाली होती. त्यात शेतकर्‍यांना शासनातर्फे मदत जाहीर करुनही अद्यापही अनेक शेतकर्‍यांना ती रक्कम मिळाली नसल्याने व आता शेतकर्‍यांच्या पेरणीची वेळ आल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी धडक तहसिल कार्यालय गाठून तहसिलदारांना निवेदन दिले आहे. माजी पंचायत समिती सदस्य गोपाल पाटील राउत यांच्या नेतृत्वात २७ मे रोजी शेकडो शेतकरी तहसिल कार्यालयावर धडकले व तहसिदार रवि काळे यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की ऑगस्ट २0१३ मध्ये अतवृष्टी झाली होती. त्यामध्ये राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला होता. त्यासाठी सरकारकडून पैसेही आले. परंतु कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यातल्या त्यात खरीप हंगाम काही दिवसावर येवून ठेपला असताना शेतकरी बी बियाण्यांच्या शोधात आहेत त्यांनी पैशाची नितांत गरज आहे. त्याकरीता त्यांना त्वरित नुकसानीचे पैसे द्यावी अन्यथा हजारो शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.त्या निवेदनावर गोपाल पाटील राउत, प्रा. आनंदा देवळे, गजानन इरतकर, पंडित लांडकर, भागवत राउत, संजय देशमुख, गोपीचंद गवई, नितीन काळे, जगदीश देशमुख, गजानन डाखोरे, भगवान जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Damaged farmers hit the tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.