शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 11:54 IST

Damage to crops on 3200 hectares due to heavy rains : नुकसानभरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   जिल्ह्यात २१ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, २८८८ हेक्टरवरील नुकसानाचा सर्वे पूर्ण झाला. दुसरीकडे ४३३ हेक्टर जमीन खरडून गेली असून मंगळवारपर्यंत नुकसानभरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.जिल्ह्यात मृग नक्षत्रात यापैकी बरसलेल्या पावसाने जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला दडी मारली होती. त्यामुळे पिके संकटात सापडली होती. दरम्यान, ११ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस बरसला. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठावरील शेतातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महसूल व कृषी विभागातर्फे युद्धपातळीवर पंचनामे सुरू असून, आतापर्यंत २८८८ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले तर ३८८ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे सोमवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे १० लहान व १० मोठी अशी एकूण २० जनावरे दगावली तर एका घराची पूर्णत: तर ४१ घरांची अंशत: पडझड झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी याकरिता मंगळवारपर्यंत शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात २१ ते २३ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे काही भागात पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात आहेत. सोमवारपर्यंत पंचनामे पुर्ण होण्याची शक्यता असून, मंगळवारपर्यंत नुकसानभरपाई संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. - शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती