पावसाच्या पाण्याने घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:03+5:302021-09-08T04:50:03+5:30
कारंजा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम आहे. अधूनमधून जोरदार स्वरूपात पाऊस कोसळत असून, हे वातावरण पिकांसाठीही पोषक ...

पावसाच्या पाण्याने घरांचे नुकसान
कारंजा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम आहे. अधूनमधून जोरदार स्वरूपात पाऊस कोसळत असून, हे वातावरण पिकांसाठीही पोषक नसल्याचे मानले जात आहे. सोयाबीनसह खरिपातील इतर पिकांमध्ये तुलनेपेक्षा अधिक पाणी साचून राहिल्यास अपेक्षित असलेल्या विक्रमी उत्पादनात बहुतांशी घट येऊ शकते, अशी शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हिवरा लाहे येथे ६ सप्टेंबरच्या रात्री धुवाधार पाऊस कोसळला. यावेळी गावात पुराचे पाणी शिरले. घरांमध्येही पाण्याचा शिरकाव झाल्याने, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने ही बाब लक्षात घेऊन नुकसानाचे तत्काळ पंचनामे करावे व नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून देय असलेली भरपाई मिळवून देण्याकरिता पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
.................
हिवरा लाहे येथे ६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. सलग एक ते दीड तास झालेल्या पावसाचे पाणी गावातील काही घरांमध्ये शिरले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही कच्च्या घरांची पावसाच्या पाण्याने पडझड झालेली आहे. महसूल विभागाने नुकसानाचे पंचनामे करून संबंधितांना भरपाई मिळवून देणे अपेक्षित आहे.
- सागर ढेरे, सरपंच, हिवरा लाहे.