शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उमरा, देपुळच्या ४० शेतकऱ्यांच्या शेतात वारा धरणाचे अतिरिक्त पाणी घुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 18:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ ( वाशिम ) : यावर्षी धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने वारा जहॉगीर सिंचन प्रकल्प १०० टक्के भरला असून, याच प्रकल्पामधील अतिरिक्त पाणी उमरा (शम.), देपूळ येथील ४० शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. दरम्यान, २०१५ पासून अतिरिक्त पाणी घुसुन बाधीत झालेल्या जमिनीची नुकसानभरपाई ४० शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही.वार जहॉगीर ...

ठळक मुद्दे ८१० एकर जमिनीपैकी उमरा येथील ३० व देपूळच्या १० शेतकऱ्यांच्या शेतात अतिरिक्त  जमिनी बाधीत झाल्या. प्रकल्पातील अतिरिक्त पाणी शेतात आल्याने उमरा व देपूळ येथील ४० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ (वाशिम) : यावर्षी धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने वारा जहॉगीर सिंचन प्रकल्प १०० टक्के भरला असून, याच प्रकल्पामधील अतिरिक्त पाणी उमरा (शम.), देपूळ येथील ४० शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. दरम्यान, २०१५ पासून अतिरिक्त पाणी घुसुन बाधीत झालेल्या जमिनीची नुकसानभरपाई ४० शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही.वार जहॉगीर सिंचन प्रकल्पाचे बांधकाम लघु पाटबंधारे विभाग वाशिमच्या अधिपत्याखाली २०१५ मध्ये पूर्ण झाले. यामध्ये संपादीत केलेल्या ८१० एकर जमिनीपैकी उमरा येथील ३० व देपूळच्या १० शेतकऱ्यांच्या शेतात अतिरिक्त  जमिनी बाधीत झाल्या. यातील उमरा शिवारातील २७ शेतकºयांच्या जमिनीची संयुक्त मोजणी झाली; परंतु तेव्हापासुन या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरळ खरेदीचे मुल्यांकन प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वाशिमच्या कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत. दरम्यान उमºयाचे शेतकरी हरीभाऊ  कºहाळे यांच्यासह १४ लोकांनी जमिनीचा पेरा, कागदपत्राप्रमाणे हंगामी बागायतीचे दर देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे  केली होती. अद्याप हा प्रश्न लालफितशाहीत अडकलेला आहे. मुल्यांकनाचे प्रस्ताव केव्हा मार्गी लागतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.दरम्यान, यावर्षी पावसाच्या पाण्यामुळे वारा जहॉगीर प्रकल्प तुडूंब भरला आहे. प्रकल्पातील अतिरिक्त पाणी शेतात आल्याने उमरा व देपूळ येथील ४० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनीची संयुक्त मोजणी लघु पाटबंधारे विभाग वाशिमतर्फे अद्याप करण्यात आली नाही. याबद्दल शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.

उमरा (शम.) येथील मुल्यांकन प्रस्ताव माझ्या टेबलवर आहे. कार्यालयीन इतर कामे संपल्यावर त्याकडे लक्ष देतो. ज्या शेतकºयांकडे  रोहयो सिंचन कराच्या पावत्या असतील त्यांना हंगामी बागायतीचे दर देता येतील.- शरद जावळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी उपविभागीय, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमDamधरणFarmerशेतकरी