सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची वाणवा
By Admin | Updated: May 26, 2014 00:25 IST2014-05-25T23:15:38+5:302014-05-26T00:25:40+5:30
वाशिम जिल्ह्यात सोयाबीनवर प्रक्रिया करणार्या उद्योगांची वाणवा आहे.

सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची वाणवा
वाशिम: पश्चिम विदर्भात आणि त्यातही वाशिम जिल्ह्यात मागील दहा वषार्ंत कापूस हे नगदी पिक नाकारुन शेतकर्यांनी सोयाबीनला अधिक पंसती दिली आहे. पण असे असले तरी जिल्ह्यात सोयाबीनवर प्रक्रिया करणार्या उद्योगांची वाणवा आहे. सोयाबीनमुळे शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. मात्र, शोकांतिका अशी आहे की, उसाचा पेरा नसतानाही साखर कारखाने अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्हयात काढल्या गेले. पण सोयाबीनचे प्रचंड उत्पादन असूनही प्रक्रिया उद्योग नाही. पश्चिम विदर्भात सोयाबीनचे प्रचंड उत्पादन होत आहे. दरवर्षी सोयाबीनच्या पेर्यात लक्षणीय वाढ होत आहे. असे असले तरी दरवर्षी सोयाबीनचा उत्पादन खर्च सुद्धा वाढतो आहे. अश्यातच जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभे राहील्यास जिल्ह्यास कृषी उत्पादनास स्थानिक बाजारपेठ मिळेल.