क्षुल्लक कारणावरुन मारहाण, एकाविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: September 26, 2014 00:36 IST2014-09-26T00:36:07+5:302014-09-26T00:36:07+5:30
शिरपूर आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या करंजी उपकेंद्रातील प्रकार

क्षुल्लक कारणावरुन मारहाण, एकाविरुद्ध गुन्हा
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या करंजी उपकेंद्रातील परिचारिका वैशाली वानखेडे हिने कुत्र्याला बांधण्यासाठी पट्टी देण्यास नकार दिल्याने आरोपी निलेश कांबळे याने परिचारिका व तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी घडली.
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या करंजी उपकेंद्रातील परिचारिका वैशाली वानखेडे यांना कुत्रा जखमी असून त्यावर बांधण्यासाठी पट्टी दय़ा अशी मागणी गावातील निलेश कांबळे याने केली. सदर परिचारिकेने हा दवाखाना माणसांसाठी आहे. जनावरांसाठी नाही असे सांगून पट्टी देण्यास नकार दिला. यावर चिडून जाउन आरोपीने सदर परिचारिकेस थापड बुक्कयांनी मारहाण केली. व
तिच्या पतीच्या हातावर काठी मारली. यामध्ये परिचारिकेच्या पतीचा हात फॅर झाला. वैद्यकीय अहवाल व परिचारिकेच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध कलम ३२५, ३२३, ५0४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. तेजराव मोरे, पो.कॉ. राजमल आगळे हे करीत आहेत.