मोबाईल बिघडला म्हणून आराेग्याची पर्वा न करता दुकानांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:10+5:302021-06-05T04:29:10+5:30
वाशिम जिल्ह्यात शिथिलता मिळाल्याने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठेत एकच गर्दी हाेत आहे. २ जूनपासून बऱ्या प्रमाणात ...

मोबाईल बिघडला म्हणून आराेग्याची पर्वा न करता दुकानांवर गर्दी
वाशिम जिल्ह्यात शिथिलता मिळाल्याने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठेत एकच गर्दी हाेत आहे. २ जूनपासून बऱ्या प्रमाणात दुकाने उघडण्यास सुरुवात झाली. त्यात माेबाईल दुकानांचा ही समावेश आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेली माेबाईलची दुकाने अचानक उघडल्याने ग्राहकांनी माेबाईल दुरुस्तीसह नवीन माेबाईल खरेदीसाठी दुकानांवर एकच गर्दी केल्याचे दिसून आले. काही दुकानदारांनी दुकानाच्या बाहेरच सॅनिटायझर ठेवलेले दिसून आले. ग्राहक आतमध्ये येण्याआधी सॅनिटायझरचा वापर करण्याची विनंतीही करण्यात आली. परंतु काही दुकानदारांनी काेराेना नियमांना बगल देत ग्राहकांना प्रवेश दिल्याचे दिसून आले.
काही दुकानामध्ये व दुकानाबाहेर ‘नाे मास्क नाे एन्ट्री’ चे फलक लावलेले दिसून आलेत. तसेच माेबाईल दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांना दुकानदारांनी सध्या माेबाईल दुरुस्ती हाेऊ शकत नसल्याचे सांगून परत पाठविले. काेराेना संसर्ग पाहता नागरिकांनी माेबाईल बिघडला म्हणून आपले आराेग्य धाेक्यात टाकणे उचित नाही. काेराेना अद्याप संपला नसून तिसरी लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. याकरिता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
..................
माेबाईल दुकानावरील
गर्दीचे कारणे
माेबाईल स्पिकर मधून आवाज येत नाही
माेबाईल चार्जिंग हाेत नाही, साॅकेट प्राॅब्लेम
स्क्रिन गार्ड बसवायचे हाेते
नवीन माेबाईल घेण्यासाठी आलाेय
नवीन हेड फाेन खरेदी करावयाचा आहे
माेबाईल लाॅक झाला उघडण्यासाठी आलाे
माेबाईल कव्हर घेण्यासाठी
मेमरी कार्ड घेण्यासाठी
माेबाईल हॅंग हाेताेय
..................
एक महिन्यांपासून माेबाईल दुकाने बंद
जिल्ह्यात मे महिन्यापासून कडक निर्बंध लावण्यात आल्याने माेबाईलची दुकाने बंद हाेती. यापूर्वी सुद्धा काही दिवस दुकाने बंद असल्याने माेबाईल खरेदी, दुरुस्ती पूर्णता बंद असल्याने दुकाने उघडल्या बराेबर शहरातील माेबाईल दुकानांवर गर्दी झाल्याचे दिसून आहे. मे महिन्यात कडक निर्बंध लावण्यात आले यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेला मुभा असल्याने माेबाईल दुकाने बंद राहिली.
.............
माेबाईल दुकानांवर दुरुस्तीसाठी गर्दी
गत एक महिन्यापासून पूर्णपणे बंद असलेले माेबाईलच्या दुकानांची पाहणी केली असता सर्वाधिक नागरिकांची गर्दी माेबाईलमध्ये असलेली बिघाड संदर्भात हाेती. माेबाईल खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात दिसून आले नाही. नुकतेच दुकाने उघडल्याने अधिक गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...........
माेबाईल ॲसेसरीज विक्री
दुकाने उघडल्याने नवीन माेबाईलची खरेदी हाेईल असे वाटले हाेते, परंतु माेबाईल ॲसेसरीज खरेदी व माेबाईल दुरुस्तीचे ग्राहक आल्याचे माेबाईल विक्रेते बसंतवाणी यांनी सांगितले
काेराेना संसर्ग पाहता दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. दुकान उघडल्यानंतर ही ग्राहक येत नसल्याचे माेबाईल विक्रेते मुन्ना शर्मा म्हणाले.
...........
मोबाईल महत्वाचाच, पण आरोग्य
माेबाईल दुरुस्तीसाठी अनेक वेळा दुकानांवर गेलाे परंतु दुरुस्तीसाठी काेणीच तयार हाेत नव्हते. आता सर्वच माेबाईलची दुकाने उघडल्याने काेराेना नियमांचे पालन करीत माेबाईल दुरुस्तीसाठी आलाे.
- साईराम नाईकवाडे, वाशिम
मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरु राहतात. घरचा माेबाईलमध्ये बिघाड झाला आहे. माझ्या माेबाईल अडकून राहत असल्याने माेबाईल दुरुस्ती आवश्यक हाेती.
- ओम कव्हर, वाशिम