बँकेतील गर्दीवर नियंत्रण मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST2021-08-26T04:44:16+5:302021-08-26T04:44:16+5:30
.................. लस घेऊन सुरक्षित होण्याचे आवाहन वाशिम : जिल्हाभरात सध्या कोरोनापासून रक्षण व्हावे, यासाठी नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. ...

बँकेतील गर्दीवर नियंत्रण मिळेना
..................
लस घेऊन सुरक्षित होण्याचे आवाहन
वाशिम : जिल्हाभरात सध्या कोरोनापासून रक्षण व्हावे, यासाठी नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यानुसार, प्रत्येकाने लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी केले.
......................
डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
वाशिम : डिझेलच्या दरात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे शेतशिवारांमधून वाहनांव्दारे पिकलेला शेतमाल शहरात आणण्याकरिता अधिकचा खर्च लागत आहे. ही बाब लक्षात घेता डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर इढोळे यांनी केली.
.............
गावठाण सर्वेक्षण कामास गती
वाशिम : गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करा. त्यासाठी तालुकास्तरीय समिती सदस्यांनी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत असून गावठाण सर्वेक्षण कामास चांगलीच गती प्राप्त झाली आहे.
...............
पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
..................
अतिक्रमण प्रस्ताव नियमानुकूल करा
वाशिम : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली.
..................
शहर स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर पालिकेने नाल्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने बुधवारी आरोग्य पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.
......................
रस्त्यांची कामे मार्गी लागणार
वाशिम : शहर विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून विशेषत: मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
........
ग्रामीण भागात वीज चोरीस आळा
वाशिम : ‘एअर बंच’मुळे (एबी केबल) विजचोरीस बहुतांशी आळा बसला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारचे केबल टाकण्यात आल्याने महावितरणचा फायदा होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
................
ठाण्यांच्या आवारात भंगार वाहने पडून
वाशिम : स्थानिक शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीची अनेक वाहने जागीच पडून आहेत. ती सध्या भंगार झाली आहेत. या वाहनांचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरिकांमधून होत आहे.
.............
नाल्यावरील पुलाची दुरवस्था
वाशिम : सुपखेलानजीकच्या नाल्यास पावसाळ्यात आलेल्या पुराने या नाल्यावरील पूल खरडून गेला. यामुळे खड्डे पडले असून, येथे अपघाताची भीती आहे. पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
........................
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे
वाशिम : गत तीन वर्षांपासून मालेगाव-शिरपूर-रिसोड-सेनगाव-हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण करणे सुरू होते. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे असल्याचे दिसून येत आहे.