आमदारांची कोटी-कोटी उड्डाणे!

By Admin | Updated: October 1, 2014 00:25 IST2014-10-01T00:25:09+5:302014-10-01T00:25:09+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील आमदारांच्या मालमत्तेचा तपशीलही लोकांसमोर.

Crores of MLA MLAs! | आमदारांची कोटी-कोटी उड्डाणे!

आमदारांची कोटी-कोटी उड्डाणे!

अनिल गवई / हर्षनंदन वाघ / बुलडाणा
खामगाव : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत मालमत्तेचा तपशीलही प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदारांच्या मालमत्तेचा तपशीलही लोकांसमोर आला आहे. त्याचा आढावा घेतला असता, आमदारांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाल्याचे दिसून येते.
दिलीपकुमार सानंदा हे २00९ साली तिसर्‍यांदा खामगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या तपशीलानुसार त्यांच्याकडे (पत्नी-अपत्यांसह)े एकूण चल-अचल संपत्ती ३ कोटी ७१ लाख १६ हजार ४९९ रुपये होती. २0१४ मध्ये आ.सानंदा आणि त्यांच्या पत्नी तसेच अवलंबितांची एकूण संपत्ती ७ कोटी ४६ लाख ५२ हजार ११३ रुपये असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञालेखावरुन दिसून येत आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षात त्यांच्या मालमत्तेत एकुण ३ कोटी ७५ लाख ३५ हजार ६१४ रुपयांची वाढ झाली आहे.
मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांनी २00९ साली विधानसभा निवडणुकीच्यावेळी सादर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार, त्यांच्या, तसेच पत्नीच्या नावे एकूण २ कोटी १६ लाख ९३ हजार २३0 रुपयांची मालमत्ता होती. यावर्षीच्या निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आ. संचेती यांची (पत्नी आणि त्यांच्यावरील दोन अवलंबित व्यक्तींसह) १२ कोटी ९६ लाख ३९ हजार ६५६ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. पाच वर्षात त्यांच्या मालमत्तेत १0 कोटी ७९ लाख ४६ हजार ४२६ रूपयांची वाढ झाली आहे.
बुलडाणा विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत मालमत्तेचा तपशीलही प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक विभागाकडे सादर केला असल्याने हा तपशील लोकांसमोर आला आहे. त्याचा आढावा घेतला तर काही उमेदवार लखपती व काही करोडपती असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेकडून सलग तीन वेळा आमदार राहिलेले विजय हरिभाऊ शिंदे चवथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी भरलेल्या शपथपत्रात ते कोट्यधीश असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्याकडे १ कोटी २८ लाख ८0 हजार २१९ रूपये संपत्ती असल्याचे त्यांनी २00९ मध्ये जाहीर केलेले आहे. तर आता २0१४ मध्ये त्यांचेकडे ४ कोटी ४ लाख ६८ हजार १११ रूपये संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले आहे. येते.

Web Title: Crores of MLA MLAs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.