पाऊस आल्याने पिकांना मिळाली संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST2021-07-09T04:26:32+5:302021-07-09T04:26:32+5:30

नुकतीच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहात आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील ...

Crops were revived due to rains | पाऊस आल्याने पिकांना मिळाली संजीवनी

पाऊस आल्याने पिकांना मिळाली संजीवनी

नुकतीच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहात आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील मजूर ठाण मांडून घरी बसला आहे. दररोज उजाडणारा दिवस पाण्याविना कोरडा जात असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. यंदा वेळेवरच मान्सूनचे आगमन होईल व तो सरासरीपेक्षा जास्त पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या अंदाजानुसार ७ ते १० जूनच्या दरम्यान मान्सूनच्या पावसाने सुरुवात करून दिली होती. त्यामुळे पावसाळा सुरू झाला असे समजून ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु ही पिके जमिनीवर येत नाहीत, तोच पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारली आहे. त्यामुळे झालेली पेरणी धोक्यात सापडली आहे. तर पावसाअभावी अद्यापही काही पेरण्या रखडल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली, अशा हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांनी खाली माना टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच दररोज कडक उन्हे पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत चालला आहे. परंतु ७ जुलैच्या रात्री तालुक्यात चांगला पाऊस पडला असून सध्या ढगाळ वातावरणामुळे आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांसाठी हा पाऊस संजीवनी ठरत आहे.

Web Title: Crops were revived due to rains