शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 18:10 IST

लाभार्थींना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असणाºया ज्या शेतकºयांनी अद्यापपर्यंत कुठल्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा ६० हजार ३०९ शेतकरी लाभार्थींना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ फायनान्शीयल सर्व्हिसेस तथा कृषी मंत्रालयाकडून आदेश प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सोमवार, १० फेब्रूवारी रोजी दिली.जिल्ह्यात २ लाख १७ हजार १९४ शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असून, वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बँकाकडून त्यापैकी १ लाख ५६ हजार ८८५ लाभार्थी शेतकºयांना पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. तथापि, कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बँकांकडून पीक कर्ज न घेतलेले प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे ६० हजार ३०९ लाभार्थी शेतकरी जिल्ह्यामध्ये आहेत. अशा शेतकºयांना बँकींग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ फायनान्शीयल सर्व्हिसेस तथा कृषी मंत्रालयाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. संबंधित शेतकºयांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता यावा, याकरिता आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लाभार्थी शेतकºयांनी अर्जासोबत शेतीचे उतारे आणि कर्ज घेतले नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बँकेतून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला, तेथे संपर्क साधावा. कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज न घेणाºया प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकºयांना कर्ज प्रोसेसिंग शुल्क आणि निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे.परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत संबंधित शेतकºयांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. ही विशेष मोहीम २५ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज