वाशिम जिल्ह्यात पीककर्ज वाटप केवळ १५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:59 PM2019-07-29T14:59:50+5:302019-07-29T14:59:54+5:30

वाशिम : खरीप हंगामाला सुरूवात होत असतानाही, जिल्ह्यातील केवळ २८ हजार ५४६ शेतकऱ्यांना २३५ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप झाले असून, याची टक्केवारी १५.३७ अशी येते.

Crop loan allocation in Washim district only 15% | वाशिम जिल्ह्यात पीककर्ज वाटप केवळ १५ टक्के

वाशिम जिल्ह्यात पीककर्ज वाटप केवळ १५ टक्के

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरीप हंगामाला सुरूवात होत असतानाही, जिल्ह्यातील केवळ २८ हजार ५४६ शेतकऱ्यांना २३५ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप झाले असून, याची टक्केवारी १५.३७ अशी येते.
२०१८ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रब्बीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अल्प बाजारभावाची भर पडली. सोयाबीनचे उत्पादन घटले; मात्र बाजारभावही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी आहेत. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामातील पेरणीसाठी उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असताना, काही राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्ज वितरणासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
जिल्ह्यात चालू खरिप हंगामात १ लाख ९३ हजार ८९० शेतकºयांना १५३० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, १२ जूनअखेर यापैकी २८ हजार ५४६ शेतकºयांना २३५ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५०४ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट असून, या बँकेने आतापर्यंत ३४.०७ टक्के पीककर्ज वाटप केले आहे.
अलाहाबाद बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडीयन ओव्हरसीस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडीकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, देना बँक आदी राष्ट्रीयकृत बँकांना ९० हजार २२६ शेतकºयांसाठी ७१४ कोटी २० लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १२ जूनपर्यंत ४४४० शेतकºयांना ३८ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले असून, याची टक्केवारी ५.३८ अशी येते.
अ‍ॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय व आयडीबीआय अशा चार खासगी बँकांना ७७.७० कोटींचे पीककर्जाचे उद्दिष्ट दिले असून, १२ जूनपर्यंत ७३९ शेतकºयांना ११ कोटी २६ लाख २७ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. याची टक्केवारी १४.५० अशी येते.
 
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेने आतापर्यंत ३५.४२ टक्के पीककर्ज वाटप करून आघाडी घेतली आहे. ३३८५ शेतकºयांना १९.६० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, १२ जूनपर्यंत २९७ शेतकºयांना ६ कोटी ९४ लाख २२ हजाराचे पीककर्ज वाटप केले. बँक आॅफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेचा अपवाद वगळता उर्वरीत बँकांना पीककर्ज वाटपाच्या टक्केवारीचा दुहेरी आकडाही गाठला आला नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँक
शेतकºयांची बँक म्हणून अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाहिले जाते. २०१९ या वर्षात या बँकेला ५०४ कोटी रुपये खरिप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १२ जूनपर्यंत २१ हजार ९२१ शेतकºयांना १७१ कोटी ९२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, याची टक्केवारी ३४.०७ अशी येते.

Web Title: Crop loan allocation in Washim district only 15%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.