४0८ कोटींचे पीक कर्ज वाटप
By Admin | Updated: May 20, 2016 01:50 IST2016-05-20T01:50:39+5:302016-05-20T01:50:39+5:30
खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपासाठी ९५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असून ४0८ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप झाले.

४0८ कोटींचे पीक कर्ज वाटप
वाशिम: सन २0१६ च्या खरीप हंगामात जिल्हय़ात ९५0 कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, १८ मेपर्यंत ५४ हजार ४१९ शेतकर्यांना ४0८ कोटी २१ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले. कृषिप्रधान देशातील शेतकरी अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे विद्यमान ह्यव्यवस्थाह्ण शेतकर्यांचा जणू ह्यअर्थह्णच काढून घेत आहे. यात निसर्गाचा लहरीपणा अधिकच भर टाकत आहे. इतरांना भरभरून देणारा, स्वत:च्या घामरूपी सिंचनातून अन्नधान्याचे उत्पादन करणारा देशाचा पोशिंदा शेतकरी स्वत: मात्र शोषित जिणे जगत असल्याची विदारक स्थिती आहे. २0१५ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकर्यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रब्बीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन घटले; मात्र बाजारभावही गतवर्षीच्या तुलनेत कमी आहेत. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीक कर्जरूपी कुबड्याच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना काही राष्ट्रीयीकृत बँका, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, या बँकेचा अपवाद वगळता अन्य बँका फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकर्यांना येत आहे. मार्च महिन्यापासूनच पीक कर्जाच्या वितरणात आघाडी घेणार्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १८ मे पर्यंत २३४ कोटींच्या वर खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शेतीच्या मशागतीसह बी-बियाणे, खते व इतर साहित्याच्या खरेदीत शेतकरी तहान-भूक विसरून पीक कर्ज काढण्यासाठी बँकांच्या पायर्या झिजवित आहेत. ह्यनो ड्युजह्णची आवश्यकता नसतानाही काही खासगी बँकांकडून ह्यनो ड्युजह्णची मागणी होत असल्याने शेतकर्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.