शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

२०७ कोटींचे पीक कर्ज वाटप; रक्कम खात्यात पडून!

By admin | Updated: May 2, 2017 01:04 IST

रोकड टंचाईमुळे शेतकरी हवालदिल : ऐन खरिपाच्या तोंडावर उद्भवला बिकट प्रश्न; पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठणेही कठीण

वाशिम : नाफेड केंद्रावरील तूर मोजणीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडत नाही; तोच शेतकऱ्यांना पीककर्ज रकमेच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. रोकड तुटवड्यामुळे पीक कर्जाची रक्कम बँक खात्यातून काढणे शक्य होत नसून ‘एटीएम’ही सदोदित बंद राहत असल्याने शेतकऱ्यांचे खरिप हंगामाचे नियोजन कोलमडत आहे. गत आठवड्यात रोकड प्राप्त होईल, अशी ग्वाही देणाऱ्या प्रशासनाला आरबीआयकडून रोकड प्राप्त करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना यंदा ११५० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दीष्ट असून १ मे २०१७ पर्यंत त्यापैकी २०७ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हाती ही रक्कम पडलेली नाही. साधारणत: दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रोकड टंचाईचे संकट उभे ठाकले असून रोखीचे व्यवहार बहुतांशी मंदावले आहेत. रोकडटंचाईचा सर्वाधिक फटका सद्या शेतकऱ्यांना बसत आहे. पीककर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असून एटीएममधूनच ती रक्कम काढण्याचे बंधन जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून टाकले जात आहे. असे असले तरी काहीठिकाणी सुरू असलेल्या एटीएममधून पाच हजारापेक्षा अधिक रकमेचा ‘विड्रॉल’ होत नसल्याने पीककर्जाची रक्कम बँक खात्यातच पडून राहत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. तथापि, बँक खात्यात पैसे असूनही, केवळ रोकड टंचाईमुळे खरिप हंगामातील पिकांच्या पेरणीकरिता आवश्यक साहित्यांची खरेदी करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे रोकड टंचाईच्या संकटाने जिल्ह्यातील शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. या समस्येवर तत्काळ प्रभावी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांना साडेपाच कोटींची व्याज सवलत!वेळेच्या आत पीककर्जाच्या रकमेचा भरणा करणाऱ्या जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ५ कोटी ४४ लाख रुपयांची व्याज सवलत देण्यात आली.खरिप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ दिला जातो. १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. मात्र, या कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे बंधनकारक आहे. एक लाख रुपयांच्या वर पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेतर्फे व्याज आकारले जाते. विहित मुदतीत पीककर्जाच्या रकमेची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत व्याज सवलत दिली जाते. या योजनेंतर्गत गतवर्षी पीककर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकऱ्यांनी विहित मुदतीच्या आत पीककर्जाची परतफेड केल्याने या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात आला. व्याज सवलतीची ही रक्कम ५ कोटी ४४ लाख रुपयांच्या घरात जाते.रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी रोकडटंचाईसंदर्भात वारंवार संपर्क साधला जात आहे. पीककर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणींबाबतही वरिष्ठांना अवगत करण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण देशातच रोकड टंचाईने तोंड वर काढल्याने कुठलाच पर्याय चालत नसून ही समस्या आणखी काही दिवस अशीच कायम राहण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांनी याकामी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. -व्ही.एच. नगराळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिमपीककर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना रोखीने पैसे अदा करण्यापुरती रोकड बँकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ठराविक रकमेचा ‘विड्रॉल’ तो ही एटीएमव्दारे दिला जावा, असे वरिष्ठांचे निर्देश असून त्याचे पालन केले जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता पीककर्ज खात्यातील रक्कम त्यांच्या बचत खात्यात वळती केली जात आहे. - टी.के.देशमुख, शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक, रिसोड