लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात बुधवार १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर पावसाने थैमान घालत शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान केले. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या नुकसानाची पाहणी प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी, पीकविमा उतरविणाºया शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे पिकविमा कंपनीकडूनही करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकºयांना ४८ तासांत कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी लागणार आहे. जिल्ह्यात पावसाने बुधवार १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवार १८ आॅगस्टपर्यंत पावसाने थैमान घातल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके नेस्तनाबुद झाली. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. या नुकसानाची पाहणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी करून शेतकºयांना आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली आणि प्रशासनाकडून या नुकसानाचे पंचनामेही करण्यास सुरुवात झाली आहे. तथापि, ज्या शेतकºयांनी यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा उतरविला आहे. त्या शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडे पीकविम्याची जबाबदारी असून, पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी या कंपनीने प्रतिनिधींची निवड केली आहे. ज्या शेतकºयांनी पीकविमा उतरविला आहे. त्या शेतकºयांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पुरावा म्हणून शेतकºयांना एक आयडी क्रमांकही प्राप्त होणार आहे. त्या आयडी क्रमांकाच्या आधारे शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी विमा कंपनीचे प्रतिनिधी करणार आहेत. या पाहणीनंतर नुकसानाची प्रत्यक्ष अहवाल तयार करून तो पिकविमा कंपनीकडे सादर करण्यात येणार आहे. यामुळे शेतकºयांना पिकविम्याचा तातडीने लाभ मिळणे शक्य होणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांनी ही माहिती दिली आहे.
पिकविमा कंपनीही करणार नुकसानाचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 17:59 IST
नुकसानाची पाहणी प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी, पीकविमा उतरविणाºया शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे पिकविमा कंपनीकडूनही करण्यात येणार आहेत.
पिकविमा कंपनीही करणार नुकसानाचे पंचनामे
ठळक मुद्देशुक्रवार १८ आॅगस्टपर्यंत पावसाने थैमान घातल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके नेस्तनाबुद झाली. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी या कंपनीने प्रतिनिधींची निवड केली आहे.