शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

खरिपातील पिके अंकुरली; पाणीटंचाई कायमच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:12 IST

वाशिम : जिल्ह्यात गत काही दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे बहुतांश गावांमधील खरिपातील पिके अंकुरली आहेत;

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात गत काही दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे बहुतांश गावांमधील खरिपातील पिके अंकुरली आहेत; मात्र पर्जन्यमान अगदीच अल्प प्रमाणात तद्वतच सार्वत्रिक स्वरूपात नसल्याने जिल्ह्यातील धरणांसह अन्य जलस्त्रोतांची पातळी न वाढल्याने उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची स्थिती अद्याप कायमच आहे. पर्यायाने पाणीटंचाई निवारण उपाययोजनांवरील खर्चात देखील यंदा वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: जून महिण्याच्या पंधरवड्यात दमदार स्वरूपात पाऊस होतो. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची कामे देखील वेळेत आटोपली जातात. यंदा मात्र पावसाला विलंबाने सुरूवात होण्यासोबतच जिल्ह्यातील काहीच गावांमध्ये तोही तुरळक स्वरूपात पाऊस झाला. त्याआधारे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली असून पिके देखील अंकुरली आहेत. असे असले तरी पिकांची वाढ होण्यासाठी पावसात सातत्य असणे आवश्यक असून त्याचा प्रामुख्याने अभाव आहे. दुसरीकडे पावसाळ्याचे दिवस असूनही अद्यापपर्यंत संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघूप्रकल्पांसह विहिरी, हातपंप आणि कुपनलिकांच्या पाणीपातळीतही विशेष वाढ झाली नसल्याने उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची स्थिती अद्याप कायम आहे. सद्य:स्थितीत ६४ गावांमध्ये ६४ टँकरने पाणीपुरवठा, ३०० पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण यासह अन्य स्वरूपातील टंचाई निवारण उपाययोजना राबविण्यात येत असून एरव्ही ३० जूननंतर बंद केल्या जाणाºया या उपाययोजनांना शासनस्तरावरून मुदतवाढ दर्शविण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाई निवारण उपाययोजनांवर प्रत्यक्ष तरतूदीपेक्षा अधिक खर्च होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती