१७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By Admin | Updated: March 12, 2015 02:03 IST2015-03-12T02:03:37+5:302015-03-12T02:03:37+5:30
अवकाळी पाऊस व गारपीट ; मानोरा तालुक्यातील ३२0 घरांची पडझड

१७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
वाशिम : जिल्हय़ात ९ मार्च रोजी वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर ३२0 घरांची पडझड झाली. जिल्हय़ातील मालेगाव व रिसोड वगळता उर्वरित चारही जिल्हय़ांमध्ये हे नुकसान असून, या तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. ९ मार्च ते १0 मार्च सकाळपर्यंत जिल्हय़ात सरासरी २७.५७ मि.मी. पावसाची तर ११ मार्च रोजी मालेगाव व रिसोड येथेच ३.१७ सरासरी पावसाची नोंद आहे. मालेगावमध्ये ७ मि.मी. तर रिसोड मध्ये १२ मि.मी. पाऊस पडला. या अवकाळी पावसासहच कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीने शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हय़ात ९ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रामध्ये गहू या पिकाचे वाशिम तालुक्यात १२0 हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यात २९00 हेक्टर, मानोरा तालुक्यात ३१९0 हेक्टर, कारंजा तालुक्यात २३९0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच वाशिम तालुक्यात हरभरा पिकांचे २५0 हेक्टर, मंगरूळपीर २५00 हेक्टर, मानोरा २५0१ हेक्टर व कारंजा तालुक्यात २५१0 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. फळपिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील ३00 हेक्टरवरील तर इतर पिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील २00 व कारंजा तालुक्यातील ४३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्हय़ात गव्हाचे ८६00, हरभरा ७७६१ , फळपिकाचे ३00 तर इतर ६३७ असे एकूण १७२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसानीची माहिती मागविली आहे.