जीर्ण ६६ पुलांच्या दुरूस्तीचा प्रश्न "लालफितशाहीत"!

By Admin | Updated: April 2, 2017 16:51 IST2017-04-02T16:51:41+5:302017-04-02T16:51:41+5:30

वाशिम : जिल्ह्यात लहान-मोठ्या स्वरूपातील सुमारे २११ पुल असून त्यातील ६६ पुलांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. दुरूस्तीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.

Critical 66 bridge repair issue "Redfish"! | जीर्ण ६६ पुलांच्या दुरूस्तीचा प्रश्न "लालफितशाहीत"!

जीर्ण ६६ पुलांच्या दुरूस्तीचा प्रश्न "लालफितशाहीत"!

वाशिम : जिल्ह्यात लहान-मोठ्या स्वरूपातील सुमारे २११ पुल असून त्यातील ६६ पुलांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. काही पूल जमीन समांतर झाले असून पावसाळ्यात यामुळे जिल्ह्यातील ३३ गावे बाधीत होतात. असे असताना गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या पुलांची दुरूस्ती तथा जमीन समांतर पुलांची उंची वाढविण्याचा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून बांधकाम विभागाचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. 

Web Title: Critical 66 bridge repair issue "Redfish"!