मारहाणीच्या दोन घटनेत दहा जणांविरुद्ध गुन्हे!

By Admin | Updated: July 12, 2017 01:41 IST2017-07-12T01:41:10+5:302017-07-12T01:41:10+5:30

मंगरूळपीर : तालुक्यातील शिवणी फाटा आणि शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी ११ जुलै रोजी १० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Criminal cases in two cases of marriages! | मारहाणीच्या दोन घटनेत दहा जणांविरुद्ध गुन्हे!

मारहाणीच्या दोन घटनेत दहा जणांविरुद्ध गुन्हे!

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : तालुक्यातील शिवणी फाटा आणि शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी ११ जुलै रोजी १० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सुखदेव कोळकर (वय ३५ वर्षे, रा. संभाजी नगर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की १० जुलै रोजी चुलत भावाच्या घरी सुरू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी महादेव कोळकर, प्रवीण कोळकर, अमोल कोळकर व एका महिलेने मारहाण करून जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद चारही आरोपींविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले.
मारहाणीची दुसरी घटना शिवणी फाट्यावर घडली. सागर परशुराम सोलव (वय २८ वर्षे, रा.जोडगव्हाण, ह.मु.वाशिम) याने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की, १० जुलै रोजी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान शिवणी फाटा येथे हनुमान ऊर्फ प्रभू गोेरे, काशीनाथ गोरे, पिंटू हिवराळे, गल्ला गोरे, तुकाराम गोरे, (सर्व रा.वाशिम) व प्रमोद मुळे (रा.वाकद) यांनी जुन्या वादाचे कारण समोर करून शस्त्रांसह हमला केला व जखमी केले. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी नमूद आरोपींविरूद्ध कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, १५०, ३२६, ३०७, १२० ‘ब’ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Criminal cases in two cases of marriages!