गुप्त धन काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल

By Admin | Updated: June 30, 2017 19:46 IST2017-06-30T19:46:33+5:302017-06-30T19:46:33+5:30

मालेगाव - घरातील गुप्त धन खोदून काढण्याचा प्रयत्न करीत असताना मालेगाव शहरातील कुटे वेटाळ परिसरातून चार जणांना पोलिसांनी अटक केली असून ,सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Criminal cases filed against six people trying to extort money | गुप्त धन काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल

गुप्त धन काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव - घरातील गुप्त धन खोदून काढण्याचा प्रयत्न करीत असताना मालेगाव शहरातील कुटे वेटाळ परिसरातून चार जणांना पोलिसांनी अटक केली असून ,सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
२९ जूनच्या रात्री २.३० वाजताच्या दरम्यान मालेगाव पोलिसांना कुटे वेटाळातील घरात गुप्त धन काढणे सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला . यावेळी गजानन महादेव कुटे , आसिफखान अजिजखान रा शिरपूर, शेख ताहीर शेख वाहेर, विठ्ठल नारायण उर्फ भागवत बोबळे, नारायण उर्फ भागवत बोबळे, पार्वती गजानन कुटे यांच्या जवळ गुप्त धन काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन नारळ, पांढऱ्या रंगांचा रुमाल, धोतर, टोपी, कपडा, १० लिंबू आदी साहित्य आढळले .
पोलिसांनी या सहा जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद केली. पोलिसांनी आसिफखान अजिंजखान, शेख ताहेर शेख वाहेर, गजानन कुटे, विठ्ठल नारायण उर्फ भागवत बोबळे यांना शुक्रवारी अटक केली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक संजय गवई यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धोत्रे करीत आहेत.

Web Title: Criminal cases filed against six people trying to extort money