रेतीची अवैध वाहतूक करणा-या ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
By Admin | Updated: January 16, 2017 01:46 IST2017-01-16T01:46:47+5:302017-01-16T01:46:47+5:30
मालेगाव पोलिसांची कारवाई.

रेतीची अवैध वाहतूक करणा-या ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
मालेगाव, दि. १५- डोंगरकिन्ही गावाजवळ रेतीची अवैध वाहतूक करणार्या ट्रॅक्टर चालकासह ११ जणांवर रविवारी मालेगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर ट्रॅक्टर हे मंडळ अधिकारी दिनकर केंद्रे यांनी अडविल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने त्यांना शिवीगाळ करून ट्रॅक्टरने उडवून जीवाने मारून टाकण्याची धमकी दिली होती, अशा आरोपावरून ही कारवाई करण्यात आली फिर्यादीत म्हटले आहे, की केंद्रे हे १४ जानेवारी रोजी सकाळी ९.३0 वाजताच्या दरम्यान एम.एच. -३७-ए -४१५४ या क्रमांकाच्या शासकीय वाहनाने मेहकर राज्य महामार्गावरून जात होते. त्यांच्या पथकाला विना नंबरचा ट्रॅक्टर दिसला. या ट्रॅक्टरला हात दाखवून थांबण्यास सांगितले. ट्रॅक्टर चालक ओम भागवत बाजड व इतर ११ जणांनी शिवीगाळ केली आणि ट्रॅक्टरने उडवून जीवाने मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध रेती होती, असे फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.