बालकामगारप्रकरणी हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा
By Admin | Updated: April 8, 2015 01:55 IST2015-04-08T01:55:47+5:302015-04-08T01:55:47+5:30
वाशिम येथील घटना.

बालकामगारप्रकरणी हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा
वाशिम : हिंगोली नाका परिसरात असलेल्या एका स्विट फरसानच्या दुकानावर बालकामगार संरक्षण अधिकारी यांच्या पथकाला बालकामगार आढळून आल्याने व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ७ एप्रिल रोजी दुपारी २:२५ वाजता घडली. वाशिम शहरामध्ये अनेक प्रतिष्ठानांवर बालकामगार असल्याची माहिती संरक्षण अधिकारी भीमराव बंडू चव्हाण यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर चव्हाण यांच्या पथकाने कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. या धाडसत्रादरम्यान हिंगोली नाक्यावरील गोविंदराव पिराजी विश्वनाथराव यांच्या भारत स्विट फरसान या प्रतिष्ठानावर १५ वर्षीय बालकामगार या पथकाला आढळून आला. या घटनेची फिर्याद संरक्षण अधिकारी चव्हाण यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी दुकान मालक गोविंदराव पिराजी विश्वनाथराव यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७४ व बालकामगार अधिनियम २000 कलम २३, २६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.