मारहाणप्रकरणी दोन गटातील २० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST2021-07-07T04:51:45+5:302021-07-07T04:51:45+5:30
फिर्यादी शफी खान अमीर खान (४४, रा अक्सा कॉलनी) यांनी सोमवारी (दि. ५) तक्रार दिली की, रविवारी सकाळी ...

मारहाणप्रकरणी दोन गटातील २० जणांवर गुन्हा
फिर्यादी शफी खान अमीर खान (४४, रा अक्सा कॉलनी) यांनी सोमवारी (दि. ५) तक्रार दिली की, रविवारी सकाळी मण्यार चौक येथे आरोपी वाहेदखान अकबर खान व अन्य नऊ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मुलास लोखंडी रॉडने मारहाण केली. फिर्यादीचा लहान भाऊ वाद सोडविण्यास गेला असता त्यालाही मारहाण करून जखमी केले तसेच फिर्यादीचे नातेवाइकांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३२४, २९४, ३२३, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ नुसार दहा जणांवर गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या गटातील फिर्यादी तौफिक खान वाहेदखान (३०, रा. मण्यार चौक) यांनी मंगळवारी (दि. ६) तक्रार दिली की, रविवारी सकाळी आरोपी शफीखान अमीर खान व अन्य नऊ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करून लोखंडी पाइपने डोक्यात मारून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम २९४, ३२३, ३२४, ५०६, १४७, १४८ नुसार दहा जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास गणेश नागरिकार करीत आहेत.