मालेगाव मारहाणप्रकरणातील १७ जणांवर गुन्हे

By Admin | Updated: May 9, 2017 02:06 IST2017-05-09T02:06:43+5:302017-05-09T02:06:43+5:30

पोलिसांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला

Crime in 17 cases of Malegaon assault case | मालेगाव मारहाणप्रकरणातील १७ जणांवर गुन्हे

मालेगाव मारहाणप्रकरणातील १७ जणांवर गुन्हे

मालेगाव : येथे जुन्या वादातून ७ मे रोजी दोन गटात झालेल्या मारहाणप्रकरणी परस्परांविरुद्ध दाखल तक्रारींवरून पोलिसांनी एकूण १७ आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, यासाठी पोलिसांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
याबाबत फिर्यादी दिनेश रुडमल अहीर (वय ५१ वर्षे, रा. मालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की आरोपी सै.साहील, शे. मोबीन शे. कलीम, सै. रफीक सै. युसूफ, शे. कलीम शे. कौसर, शे. सुलतान शे. युनूस व अन्य दोन जणांनी मालेगाव येथील जाट गल्लीत गणेश अहीर यास जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी नमूद सात आरोपींविरुद्ध कलम ३0७, ३३६, १४३, १४८, १४९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. दुसर्‍या गटाकडून फिर्यादी शे. मोहसीन शे. मकसूद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की साईनाथ ट्रान्सपोर्टजवळून जात असताना आरोपी गणेश अहीर, सागर अहीर, विक्की अहीर, रामा अहीर, शामा अहीर, गणेश वर्मा, गोविंदे, सोनू अहीर व इतर दोघांनी मारहाण केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी दहा आरोपींवर कलम ३२३, ३५२, १४३, १४७, १४८, १४९, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Crime in 17 cases of Malegaon assault case