नवसाहित्यिकांनी कांबळे यांचा आदर्श घेऊन साहित्य निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:39 IST2021-02-12T04:39:17+5:302021-02-12T04:39:17+5:30
स्थानिक श्री व्यंकटेश सेवा समितीचे तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, वाशिमच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष अॅड. विजयराव जाधव यांनी ...

नवसाहित्यिकांनी कांबळे यांचा आदर्श घेऊन साहित्य निर्मिती करा
स्थानिक श्री व्यंकटेश सेवा समितीचे तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, वाशिमच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष अॅड. विजयराव जाधव यांनी कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन ना. चं. कांबळे यांचा सत्कार केला. जाधव म्हणाले, ना. चं. कांबळे यांना भारत सरकारने पद्मश्री २०२१ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना १९९५ राघव वेळ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा आणि आकाशवाणी अशा विविध क्षेत्रात ना. चं. कांबळे यांनी आपला ठसा उमटवला आहे.
सत्कारप्रसंगी धनंजय रणखांब, नितेश राठी, प्रा. डॉ. संतोष धामणे, प्रा. डॉ. संतोष इंगोले, प्रा. दत्तात्रय ढवारे, प्रा. डॉ. विजय जाधव, प्रा. डॉ. बाळासाहेब पौळ, प्रा. कु. रिंकु रुक्के यांची उपस्थिती होती.