चोरट्यांच्या धुमाकुळाने नागरिकांमध्ये दहशत
By Admin | Updated: August 2, 2016 01:47 IST2016-08-02T01:47:09+5:302016-08-02T01:47:09+5:30
२ लाख ५0 हजाराचा ऐवज लंपास.
_ns.jpg)
चोरट्यांच्या धुमाकुळाने नागरिकांमध्ये दहशत
वाशिम : अज्ञात चोरट्यांनी रविवार व सोमवारच्या रात्रीदरम्यान तीन ठिकाणी चोर्या करून अंदाजे २ लाख ५0 हजाराचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चोरट्यांनी देवपेठ, तिरूपती पार्क व दत्त नगर परिसरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील किराणा व्यवसायी देवेंद्र बज यांना ३१ जुलै रोजी रात्री ८:३0 वाजता अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून १ लाख ७0 हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनेनंतर रात्री दरम्यान हॅपी फेसेस शाळेजवळ असलेल्या तिरूपती पार्कमधील महावीर रूपचंद बांडे यांच्या घरामध्ये चोरट्याने प्रवेश करून पलंगावर ठेवलेल्या पॅन्टच्या खिशामधून रोख ५0 हजार रुपये लंपास केले. दत्त नगर परिसरातील बळीराम मोपकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामध्ये ठेवेलेले ३४ हजार ७00 रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले. या घटनेची फिर्याद शंकर शिंदे यांनी पोलीस स्टेशनला १ ऑगस्ट रोजी दिली.